वनविभागाची सावदयात कारवाई विनापरवाना सागवान फर्निचर सह मालवाहू वाहन जप्त..

रावेर – सावदयात रावेर वनविभागाची कारवाई दि. 26 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते सावदा रस्त्याने गस्त करीत असताना मौजे सावदा गावाजवळ टाटा कंपनीच्या MH -04 FJ 3248 या क्रमांकाच्या मालवाहतूक गाडीची तपासणी केली असता त्यात, सागवान पलंग नग -04,सोपासेट नग-01
मिळून आले सदर माला विषयी वाहन चालक गणेश भीमराव खैरनार रा. जळगाव यांना माला विषयी लागणाऱ्या पास परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले, सदर सागवान पलंग व सोपा मालाचे मोजमाप घेतले असता= 0.524 घ.मी एवढा असून सदर मालाची बाजार भाव आदमासे रक्कम 64500 रुपये असून ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या मालवाहतूक गाडीची किंमत अदमासे 126000 रू. असून एकूण रक्कम= 190500 एवढी आहे. सदर वाहन पुढील चौकशी कामी आगार डेपो रावेर या ठिकाणी जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही उप वनसंरक्षक,जमीर शेख ,यावल वनविभाग जळगाव, व आर .आर.सदगीर, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच प्रथमेश हळपे साहेब सहायक वन संरक्षक चोपडा व समाधान पाटील सहाय्यक वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय ना.बावणे , रवींद्र सी.सोनवणे वनपाल रावेर, सुपडू सपकाळे आगार रक्षक रावेर, जगदीश जगदाळे वनरक्षक जुनोना यांनी केली.