यावल

भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा सरचिटणीस डॉ.कुंदन फेगडे यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अभिनंदन..

यावल दि.१३ ( सुरेश पाटील ) – भाजपा प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नागपूर व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी यावल येथील भाजपा वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा ( पूर्व ) सरचिटणीस डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या जनसंपर्काचा व संघटनपर्वात किमान १ हजार सदस्य जोडल्याने लेखी पत्र देऊन अभिनंदन केले आहे.

डॉ. कुंदन फेगडे यांना मिळालेले अभिनंदन पत्र बघितले असता भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत.यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते.आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे,तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही,याची सर्वांना खात्री आहे.संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे,शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत.

आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन ! करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली स्वाक्षरी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा
WhatsApp Group