जि .प. मराठी शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी..

जळगाव / प्रतिनिधी – जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीचा गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून शुक्रवार दि. २ मे रोजी समुपदेशन प्रक्रियेद्वारे तयां पारदर्शक पद्धतीने ६४ शिक्षकांना मुख्याद्यापक व केंद्रप्रमुख पदी पदोन्नती देण्यात आली.
जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नतीच्या प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मीनल करनवाल रुजू झाल्यानंतर त्यांनी रखडलेल्या पदोन्नत्यांचा प्रश्न निकाली काढण्याचा धडाका सुरु केला असून शुक्रवार दि. २ मे रोजी समुपदेशन पद्धतीद्वारे पारदर्शक पद्धतीने शिक्षकांना मुख्याद्यापक व केंद्रप्रमुख पदी पदोन्नती देण्यात आली.

त्यात पदवीधर शिक्षकांमधून ४० जणांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली. त्यात मराठी माध्यमाच्या ३४ व १ दिव्यांग तर ५ उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. तर पदवीधर शिक्षकांमधून पदोन्नती देण्यात आलेल्यांमध्ये मराठी माध्यमाचे १७ तर दिव्यांग १ व उर्दू माध्यमाचे ५ व उर्दू माध्यमाचे दिव्यांग १ अशा २४ शिक्षकांना मुख्याद्यापक पदी पदोन्नती देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्वतः जिल्हापरिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पदोन्नती पात्र शिक्षकांचे समुपदेशन घेतले या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,शिक्षणधिकारी (प्राथमिक) विकास पाटील हे उपस्थित होते.