जळगावब्रेकिंग

कानळदा गावास CEO करिश्मा नायर यांची अचानक भेट : आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास कामांचा घेतला आढावा..

जळगाव, दि. २०  – जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवारी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. या भेटीद्वारे गावातील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेत त्यांनी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर या जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेत असून, त्याचाच भाग म्हणून कानळदा गावातील सेवा-सुविधांची पाहणी करण्यात आली. अचानक झालेल्या या भेटीमुळे स्थानिक प्रशासनात चांगलीच हालचाल निर्माण झाली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णसेवा, स्वच्छता, औषधसाठा आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती याबाबत माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, यावर भर देत त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या.

यानंतर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रात भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा, पोषण आहार, स्वच्छता आणि सुरक्षिततेची पाहणी करत शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करत विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ईतर महत्वाच्या बातम्या 

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली..

कृषी विभागातर्फे खत कंपनी प्रतिनिधी, व विक्रेत्यांची जिल्हास्तरिय कार्यशाळा संपन्न..

चोपड्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त : चोपडा पोलिसांची कारवाई..

शनिपेठ पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस नाईक थेट बडतर्फ : पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे