जळगाव
नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला पदभार..

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारत जिल्हा पोलिस दलाची सूत्रे हाती घेतली. यावेळी मावळते पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना औपचारिक निरोप देण्यात आला असून, त्यांच्या कार्यकाळातील कायदा-सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे पोलिस अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.