नशिराबाद जवळील उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने तीन मजुरांना झोपेतच चिरडले..
नशिराबाद – रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द पुलाजवळ मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपेंद्र मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर अशी मृतांची नावे आहेत.
जळगाव खुर्द परिसरात उड्डाणपूला लगत सुरू असलेल्या सर्विस रोडच्या कामाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज उघडकीस आली होती. हे तिघही तरुण उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. सर्विस रोडचे काम अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी इतर वाहने जाण्याचा संबंध येत नाही.
त्यामुळे रात्री सर्विस रोडच्या कामाच्या ठिकाणी कोण कोणती वाहने रात्रीतून आली होती याचा शोध घेतला जात असून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. रात्री आठ साडेआठ वाजेनंतर काम आटोपल्यावर जेवण करून ये तिघेही मजूर झोपले होते. झोपेतच या तिघांना कामावरीलच कुठल्यातरी वाहनाने चिरडल्याचे शक्यता आहे.