पतीचे अनैसर्गिक कृत्य,सासरा, नंदोईकडून अत्याचार : विवाहितेच्या तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
यावल दि.५ ( सुरेश पाटील ) भुसावळ येथील माहेर असलेल्या एका २९ वर्षीय बांधकाम व्यवसायकाने पत्नीने माहेरून २५ लाख रुपये आणले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर अनैसर्गिक कृत्य तथा अत्याचार केला तसेच सासरे आणि नंदोई
यांनी देखील अत्याचार करून याची माहिती कोणाला सांगितली तर तुला आणि तुझ्या भावाला आणि वडिलांना जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिल्याच्या कारनावरून आणि फिर्यादी यावरून यावल पोलीस स्टेशनला ७ जणांविरुद्ध करण्यात आला आहे.
भुसावळ येथील माहेर असलेल्या या तरुणीचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला.
पैशांसाठी तिचा वेळोवेळी छळ झाला.११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान
छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुनील मोरे करीत आहेत. अशाप्रकारे
गुन्हा दाखल झाल्याने यावल शहरासह परिसरात आरोपी कोण..? याबाबत चर्चा सुरू आहे.