जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा धमकीचा मेल..
जळगाव – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून ठार मारण्याच्या धमकीचा मेल आलेला आहे. याच व्यक्तीने कार्यालयालादेखील मुख्यमंत्री जळगावचे जिल्हाधिकारी यांना जिवे मारण्यासंदर्भात मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांना ठार मारू, असा उल्लेख या ई-मेल मध्ये करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
यापूर्वीदेखील एक महिन्यापूर्वी काही पोलिस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयात काही दुखावलेल्या अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ई-मेलच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या असल्याची माहिती अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. याबाबत दक्षता म्हणून सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या इमेलचा तांत्रिक तपास सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
याप्रकरणी पोलिस अधीक्षकांकडून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात अनेक अधिकाऱ्यांनादेखील असे धमकीचे मेल आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यानी पत्रकारांशी बोलताना दिली.