रावेर
आ. अमोल जावळे यांच्या गारपीटग्रस्त रावेर परिसरात तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना..
रावेर जळगाव/ हमीद तडवी – रावेर परिसरात अचानक गारपीट झाली. सुमारे 8 ते 10 मिनिटे जोरदार गारांचा मारा झाला आणि त्यानंतर हलकासा पाऊस झाला. या अनपेक्षित हवामान बदलामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना धक्का बसला आहे.
गारपीटीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केळी, कपाशी यासारख्या पिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिकांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली असून तातडीने सरकारी मदतीची मागणी केली आहे.घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना अलर्ट केले आहे. प्रशासनाकडून आता पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.