जळगाव – 600 रुपयाची लाच घेतांना भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता, लिपीक, व कंत्राटी कामगारा ला जळगाव एसीबी रंगेहाथ पकडले असून शाम समाधान साबळे, नगर पालीका भुसावळ पाणीपुरवठा विभाग कंत्राटी कामगार सतिष सुरेशराव देशमुख, पाणीपुरवठा अभियंता पाणीपुरवणा विभाग भुसावळ वर्ग 3, शांताराम उर्खडु सुरवाडे , लिपीक पाणी पुरवठा विभाग भुसावळ असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे प्लंबर असून त्याचे प्रत्येक वर्षाला लायसन्स नुतनिकरण करावे लागते. त्यासाठी तक्रारदार हे पाणी पुरवठा विभाग भूसावळ येथे गेले असता यातील शाम समाधान साबळे, कंत्राटी कामगार पाणीपुरवठा विभाग यांनी पंचा समक्ष 700 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर शाम समाधान साबळे, कंत्राटी कामगार यांनी सतिष सुरेशराव देशमुख, पाणीपुरवठा अभियंता पाणी पुरवठा विभाग भुसावळ वर्ग 3 यांना कॉल केला असता आरोपी क्र. यांनी 600/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे शाम समाधान साबळे, यांचेकडेस लाचेची रक्कम 600/- रुपये घेवून गेले असता आरोपी शाम समाधान साबळे यांनी शांताराम उर्खडु सुरवाडे , लिपीक यांना कॉल करून साहेबांनी 600 रुपये घेण्यास सांगितले आहे असे सांगून त्यांना लाचेची रक्कम घेण्यास सांगितले, त्यानंतर शांताराम उर्खडु सुरवाडे , लिपीक यांना सदरची लाच रक्कम स्विकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर बाबत वर नमुद आरोपी यांचे विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने केली