जळगावात पुन्हा निर्घृण खून : तरुणावर धारदार शस्त्राने वार..

जळगाव – शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजच्या जवळ एका ३० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.मयत तरुणाचे नाव आकाश पंडीत भावसार रा.अशोक नगर, जळगाव असे आहे. मयताला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या नगरजवळ असलेल्या अशोक नगरात राहणारा आकाश पंडीत भावसार हा तरुण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीच्या नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी हॉटेल ए वनजवळ गाठले.धारदार शस्त्राने तरुणांनी त्याच्यावर हल्ला केला. मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार झाल्याने तो रक्तबंबाळ झाला. आकाश यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. मयतच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे. सदर खून कौटुंबिक वादातून झाल्याचे माहिती. जिल्ह्यात खून आणि गोळीबाराची मालिका सुरूच आहे.४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
