जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन..

जळगांव /प्रतिनिधी :-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभा दि 21 मे रोजी धरणगाव पंचायात समिती येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या वेळी एकूण 16 तक्रारी प्राप्त झाल्या प्राप्त तक्रारीवर उपस्थित विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत तात्काळ निराकरण करण्यात आले. यावेळी प्राप्त घरकूल योजनेबाबत च्या तांत्रिक तक्रारिंवर लागलीच ऑनलाईन पद्धतीने कॅम्प लावून सदर तक्रारीचे ताबडतोब निराकरण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक आर एस लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत )भाऊसाहेब अकलाडे, शिक्षण अधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे, समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद पांढरे, सिंचन विभागाचे अभियंता अमोल पाटील , धरणगावचे गटविकास अधिकारी किशोर वानखेडे यांच्यासह इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.
धरणगाव पंचायत समिती सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल या जळगाव जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर त्यांनी लोकोपयोगी विविध उपक्रम सुरु केले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापना अंतर्गत येणारे विविध कार्यालये तसेच पंचायत समिती शी संलग्न विविध कार्यालये शी संबंधित अनेक तक्रारी वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. एवढेच नव्हे तर किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. हा त्रास टळावा त्या सोबतच नागरिकांच्या समस्यावर जागच्या जागी तोडगा निघावा या दृष्टीने जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी महिन्यातून दोन वेळा तालुक्यावर जाऊन तालुका स्तरावर तक्रार निवारण सभा घेण्याबाबत निर्देशीत केले होते. त्या प्रमाणे बुधवार दि. 20 मे रोजी तक्रार निवारण सभा आयोजित करण्यात आली होती. या तक्रार निवारण सभेस जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमूख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी या उपक्रमास नागरिक व ग्रामस्थ यांनी मोठा प्रतिसाद दिला. तक्रारदारांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या तक्रारी उपस्थित अधिकारी यांचे समोर मांडल्या. या सभेत आलेल्या घरकूल योजने बाबतच्या तांत्रिक स्वरूपाच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांनी स्वतंत्र कॅम्प लावत जागच्या जागे वरून मुख्यालयाशी संपर्क साधून सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी जागीच सोडविल्या. या वेळी श्री. लोखंडे यांनी या बाबत उपस्थित ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना ग्रामसेवक यांनी सातत्याने ऑनलाईन पद्धतीने अपडेट राहिल्यास घरकूल बाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त होणार नाहीत. व नागरिकांना देखील घरकूल बाबत सर्व माहिती मिळत राहील यासाठी ग्रामसेवक यांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे. जालजीवन मिशन च्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने या वेळी आढावा घेण्यात आला. यावेळी सुरु असलेल्या बांधकामांचा गाव निहाय आढावा यावेळी. घेण्यात आला. त्या सोबतच ग्राम अधिकारी यांचेकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी आढावा. घेऊन सूचनाकेल्यात. या वेळी. प्राप्त झालेल्या. सर्व तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात. आले.