गुन्हेगारीजळगाव

गावठी कट्टयासह दोघांना LCB च्या पथकाने केले जेरबंद..

जळगांव – दि.०८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांना गोपनिय बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम सिरवेल, ता.भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथून अवैधरित्या गावठी कटूटे विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पाल ता. रावेर च्या मार्गे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदरची माहीती स.फौ. यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविली असता, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव कडिल पथक तयार करुन, त्यांना मिळालेल्या माहिती च्या अनुषंगाने कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. त्या प्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र येथे जंगल परिसरात सापळा रचला. मिळालेल्या माहीतीप्रमाणे पाल ता. रावेर जि जळगाव च्या जंगल परिसरात पथकातील अधिकारी व कर्मचारी सापळा लावून थांबलेले असतांना, अंदाजे ४५ वर्षाचा इसम TVS RAIDER कंपनीची क्र. MP-१०-२८-९६५० काळया रंगाची मोटार सायकलवर डोक्याला निळी पगडी बांधलेला दिसून आला तसेच एक अंदाजे २५ वर्ष वयाचा इसम TVS SPORT कंपनीची MP-१०-MV-१४६२ काळया रंगाची मोटार सायकलवर येतांना दिसले. त्यांना फॉरेस्ट नाका पाल येथे सापळा पथकातील अंमलदार थांबवत असतांना, ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले त्यावेळी ते सापळ्यातुन पळून जाण्यात यशस्वी झालेत. त्यांचा पाठलाग करुन व पुढे दोन्ही रस्त्यावर लावलेल्या सापळयात आरोपीतांना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्या दोन इसमांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ०२ गावठी कट्टयासह ०२ मोटार सायकली, ०२ मोबाईल हॅन्डसेट असे एकूण १,७०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाला सह. १) गोविंदसिंग ठानसिंग बरनाला, वय-४५, रा. सीरवेल महादेव ता. भगवानपुरा जि. खरगोन, (म.प्र.), २) निसानसिंग जिवनसिंग बरनाला, वय-२३, रा.उमर्टी ता.वरला जि.बडवाणी ह.मु. रा. सीवेल महादेव ता. भगवानपुरा (म.प्र.) यांना रावेर पोलीस स्टेशन हजर करण्यात आले. त्यांचे विरुध्द रावेर पोलीस ठाणे CCTNS गुर.नं. २५४/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास पो.उप.निरी. तुषार पाटील, नेम. रावेर पो.स्टे. हे करीत आहेत.

वाढत्या गुन्हेगारी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोंकावर आळा घालण्याकरीता जनतेस जळगाव पोलीसांकडून आव्हान करण्यात येते की, आपणास अशा अवैध गावठी हत्यार बाळगणाऱ्या इसमांबाबत माहीती प्राप्त झाल्यास, तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास संपर्क करुन माहीती द्यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आव्हान करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे