
यावल दि.६ ( सुरेश पाटील ) – शुक्रवार दि.६ जून २०२५ रोजी साकळी महसूल मंडळात अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून पुढील कारवाईसाठी यावल तहसील आवारात जमा केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,थोरगव्हाण पिळोदे रस्त्यावर अवैध रेती वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर सचिन साकळी भाग मंडळ अधिकारी जगताप, साकळी येथील महसूल सेवक गणेश महाजन, मनवेल महसूल सेवक विजय भालेराव,न्हावी प्र.अडावद यावल येथील महसूल सेवक विकास सोळंके यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले.
सदरची कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिगाव येथील ग्राम महसूल अधिकारी मिलिंद कुरकुरे,सातोद येथील ग्राम महसूल अधिकारी कुंभार आप्पा, दहिगाव येथील महसूल सेवक विजय साळवे,रामा कोळी,अरविंद बोरसे यांच्यासह पोलीस दलाचे अमूल्य सहकार्य लाभले.