जळगाव – महावितरणच्या कंत्राटी वायरमनला 5 हजारांची लाच घेतांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून भूषण शालिग्राम चौधरी, कंत्राटी वायरमन (प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांच्या राहते घराचे वीज मीटर हे पूर्वीचे मालक यांच्या नावे असल्याने महावितरण तर्फे वीज मीटर बदलण्याचे कार्य चालू असताना तीन दिवसापूर्वी वायरमन भूषण चौधरी हे तक्रारदार यांच्या घरी वीज मीटर बदलण्यासाठी आले असता त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले असून तुम्ही त्यात छेडछाड केल्याने तुम्हाला आर्थिक दंड होऊन तुमच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व वीज मीटर टेस्टिंग चा रिपोर्ट ओके देण्यासाठी भूषण शालिग्राम चौधरी, कंत्राटी वायरमन यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याबाबत दि.10/06/2025 रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्या प्रमाणे आज रोजी पडताळणी केली असता भूषण शालिग्राम चौधरी, कंत्राटी वायरमनने पंचासमक्ष 5000 रुपये लाचेची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज रोजी सापळा कारवाई आयोजित केली असता भूषण शालिग्राम चौधरी, कंत्राटी वायरमन याने पंचसमक्ष 5000 रुपयांची लाच स्वीकारली म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले असून रामानंद नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक, योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे ,सफौ सुरेश पाटील चालक,पोहेकॉ/सुनील वानखेडे, पोकाॅ/अमोल सूर्यवंशी, यांनी केली.