जिल्हा परिषद इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना घरपट्टी,पाणीपट्टी माफ..
या उपक्रमात घरपट्टी,पाणीपट्टी माफ करणारी पहिली ग्रामपंचायत कोरपावली .

यावल ( सुरेश पाटील ) – यावल तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली वर्गात ज्या विद्यार्थ्यांची नावे दाखल होतील त्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना सन २०२५ – २६ या वर्षाची घरपट्टी,पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय कोरपावली ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच सदस्यांनी एका बैठकीत घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पाल्यांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करणारी यावल तालुक्यातील कोरपावली ही पहिली ग्रामपंचायत आहे. सोमवार दि. ०९ जून २०२५ रोजी मासिक समभेमध्ये ठराव पारीत करण्यात आला की जो कोणी पाल्य आपल्या मुलांना जिल्हा परीषद शाळा कोरपावली मध्ये इयत्ता १ ली वर्गात सन २०२५ /२०२६ ह्या शैक्षणिक वर्षा मध्ये प्रवेश घेईल त्या पाल्यांचा कुटुंबांना सन २०२५ / २६ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी हे कर माफ राहतील असे मासिक सभेमध्ये सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला
कोरपावली ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच विलास नारायण अडकमोल,उपसरपंच,सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश बाबुराव देवकर उपस्थित होते, मुला मुलींना जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत नाव दाखल करणाऱ्या पाल्यांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत कोरपावली ठरल्याने या निर्णयाचे ग्रामस्थांसह तालुक्यातून सर्व स्तरातून कोरपावली ग्रामपंचायतचे कौतुक होत आहे.