उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा..
जळगाव, दि. 29 : उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव तर्फे दि. 29 जून, 2025 रोजी सकाळी 10:00 वा. ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला. प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत सरकारने दरवर्षी 29 जून हा दिवस त्यांच्या जयंती निमित्त “सांख्यिकी दिन” म्हणून विशेष श्रेणीमध्ये नियुक्त केला आहे.
सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी विशेषत: तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे. सदर कार्यक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ येथील संख्याशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. मनोज पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे राहुल इधे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी हे होते. समीर भालेराव, कार्यक्रमाचे संयोजक तथा सांख्यिकी अधिकारी, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सांख्यिकी दिनासाठी यावर्षी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांचेकडुन “75 years of National Sample Survey” ही संकल्पना (Theme) निश्चित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा मानव विकास कार्यालयाचे नितीन पाटील सहायक संशोधन अधिकारी तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी सहायक विनोद घुले, शोभा जाधव, हर्षल चौधरी, भैरवसिंग पाटील व सांख्यिकी अन्वेषक रितेश वैष्णव व कल्याणी कुलकर्णी कार्यक्रमास उपस्थित होते. समीर भालेराव, सांख्यिकी अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.