स्वस्ती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट..

जळगाव – नेटवर्क ऑफ महाराष्ट्र पीपल लिविंग विथ एच आय व्ही, जळगाव यांच्या माध्यमातून, टाटा एआयजी आणि स्वस्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त पाठिंब्याने सावखेडा गावात सोशल प्रोटेक्शन स्कीमस प्रकल्प अंतर्गत गरजू लोकांना १)आयुष्यमान भारत कार्ड्स इ .केवायसी २) ई – श्रम कार्ड्स तसेच ३)प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना ४)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ देण्यात आला. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून याचा लाभ घेतला.
तसेच, दिनांक 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात, स्वस्ती फाउंडेशनच्या शेहनाज शेरीफ, एन .एम .पी .प्लसच्या प्रकल्प जिल्हा समन्वयक अनिता पाटील आणि मनिषा साळुंखे, पुणे यांनी टीमसोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मागील वर्षाचा कामाचा आढावा सादर केला. जिल्हाधकाऱ्यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या आणि टीमला त्यांच्या कामाच्या निगडीत विभागाशी ओळख करून दिली. तसेच, भविष्यात काही मदत लागली तर मला संपर्क करा, असेही सांगितले. अनिता पाटीलनी टीम तर्फे जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.