शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अनोखे आंदोलन..

जळगाव – दि. २१ जुलै २०२५ वार सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगांव ग्रामीणचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार मधील अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्य चे कृषी मंत्री कोकाटे,शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम,भाजप नेते प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला चुना लावून तीव्र निषेध करण्यात आला.
आपल्या महाराष्ट्रात रोज ८ शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या करत आहेत आणि इकडे कृषी मंत्री विधानभवनात ऑन लाईन जंगली रमी खेळत आहेत.म्हणजे यांना शेतकरी विषयी ज्या समस्या आहेत कर्जमाफी,हमीभाव,भाव फरक या गोष्टीचा विसर पडला आहे.एकीकडे राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायला पाहिजे पण गृहराज्यमंत्री योगेश कदम त्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालवत आहेत,दुसरीकडे मंत्री महाजन यांचे भाजपाचे नेते प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरणा मध्ये झाली आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे,अशोक आप्पा सोनवणे,किरण ठाकूर,लोटन सोनावणे,प्रभाकर कोळी,धनराज वारडे,रघुनाथ सोनवणे,स्वप्नील पाटील,खुशाल पाटील,राजू पाटील,अनिल बोरसे,नितीन चौधरीव पदाधिकारी उपस्थित होते.*