
जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेच्या सहायक महसुल अधिकारी सह खाजगी इसमास 2 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून प्रशांत सुभाष ठाकूर, सहायक महसुल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव (खाते अभिलेख शाखा) व संजय प्रभाकर दलाल ( खाजगी इसम ) असे दोघांचे नाव असून दोघांना लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.16/06/2025 रोजी त्यांचे गावातील ग्रामपंचायत व सदस्य यांचेविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे यातील प्रशांत सुभाष ठाकूर, सहायक महसुल अधिकारी व संजय प्रभाकर दलाल, (खाजगी इसम) यांना भेटले होते.तेव्हा त्यांनी नकला काढून देण्याच्या मोबदल्यात 2000/- रु . लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि.23/07/2025 रोजी ला. प्र. विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील संजय प्रभाकर दलाल, (खाजगी इसम) यांनी “शासकीय फी व झेरॉक्सचे 1400/- रुपये व 600/- रुपये आमचे “असे म्हणून असे एकूण 2000/- रू . लाचेची मागणी केली. व प्रशांत सुभाष ठाकूर, सहायक महसुल अधिकारी यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.त्यानंतर संजय प्रभाकर दलाल, (खाजगी इसम) यांनी लाच रक्कम स्विकारली म्हणून आरोपी प्रशांत सुभाष ठाकूर, सहायक महसुल अधिकारी व संजय प्रभाकर दलाल, (खाजगी इसम) यांना रंगेहात पकडले.सदर तपासात 880/ रू . शासकीय शुल्क व 1120/- रु. लाच रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले.सदर प्रकरणी दोघां विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई जळगाव एसीबी चे पोलिस उप अधिक्षक, योगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे स. उपनिरी सुरेश पाटील चालक पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/ अमोल सुर्यवंशी यांनी केली.