रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर LCB ची धाड..

जळगाव – जिल्ह्यात तसेच शहरात अनेक ठिकाणी सर्रास अवैध धंदे सुरु असून रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत हरीविठ्ठल नगर भागात पत्याच्या अड्डा चालु असल्याबाबत स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, यांना मिळालेल्या माहीती वरुन सदर जुगाराच्या अड्डयावर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना कारवाई करण्यास सांगितल्या नुसार दिनाक ०८ रोजी रात्री च्या सुमारास धाड टाकुन ०९ आरोपीतांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून रोख रक्कम तसेच इतर साहीत्य (मोटरसायकल, मोबाईल) असे एकूण ३,१४,३४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नमुद गुन्हयाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रविण भालेराव, धनगर, पोना किशोर पाटील, पोशि रविंद्र कापडणे यांच्या पथकाने केली आहे.