36 हजारांची लाच : वनविभागाचे लाचखोर अधिकारी ACB जाळ्यात..

पारोळा – बांबू लागवड योजनेच्या फाईल मंजूरीसाठी 40 हजाराची लाच मागून 36 हजाराची लाच घेतांना सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जळगाव ACB ने रंघेहाथ पकडले.
यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांचे 03 नातेवाईक अशांना शेतामध्ये बांबु लागवड करावयाची असल्याने तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ०४ फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे RFO मनोज कापुरे यांच्याकडे असल्याने दि.२३/०७/२०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा कार्यालयात जावुन RFO मनोज कापुरे यांना भेटुन बांबु लागवड करावयाच्या वर नमुद व्यक्तींच्या नावे असलेल्या ०४ फाईली मंजुर करण्यासाठी प्रत्येक फाईलचे १०,०००/- रू प्रमाणे एकूण ४०,०००/- रू दयावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. ०५/०८/२०२५ रोजी ला.प्र. विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीप्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील मनोज बबनराव कापूरे, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा, व निलेश मोतीलाल चांदणे, लिपीक वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा. यांनी तक्रारदार व त्यांच्या वर नमूद नातेवाईकांच्या बांबू लागवड संदर्भात ०४ फाईली मंजूर करण्याकरिता प्रत्येक फाइलचे १०,०००/- असे एकूण ४०,००० ची मागणी करून ३५,०००/- रुपये स्वतःसाठी व १,०००/- रुपये निलेश मोतीलाल चांदणे, लिपीक वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकरिता अशी तडजोडीअंती ३६,०००/- रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व सदरची रक्कम ही कैलास भरत पाटील ( कंत्राटी कर्मचारी) याच्याकडे देण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे कैलास भरत पाटील यांनी पंचांसमक्ष लाच रक्कम स्विकारली. म्हणून मनोज बबनराव कापूरे, वन परिक्षेत्र अधिकारी, निलेश मोतीलाल चांदणे, लिपीक वन परिक्षेत्र अधिकारी व कैलास भरत पाटील ( कंत्राटी कर्मचारी) यांना रंगेहात पकडण्यात आले.या बाबत तिघांन विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई जळगांवपोलिस उप अधिक्षक, योगेश ठाकूर, पो. नि., हेमंत नागरे,यांच्या पथकाने केली.