शेतकऱ्यांची कापुस विक्रीच्या रक्कमेची बॅग पळवणारे दोघे जेरबंद..
धुळे – दि.09 रोजी दुपारी 03.20 वा.चे सुमारास फिर्यादी दिलीप महादु गर्दै, रा. आवी.ता.जि.धुळे व त्यांचे सहकारी संतोष मोतीराम मासुळे, रा.सडगांव ता.जि. धुळे हे त्यांचे कापुस विक्रीचे 13,15,200/- रुपये घेवुन त्यांचे मोटार सायकलने धुळे कडुन आवी गावाकडे जात असतांना लळींग टोलनाक्याच्या पुढे रानमळा फाट्याजवळ एका विना क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटार सायकलवर तोंडाला मारक बांधुन आलेल्या 03 अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांचा रस्ता अडवुन संतोष मासुळे यांच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचे जवळ असलेली 13,15,200/- रुपयांची बंग हिसकावून पळून गेले होते. त्यावरुन मोहाडीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व मोहाडी नगर पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा समांतर तपास करुन सदर गुन्हा उघडकीस आणला असता सदर 1) रितिक ऊर्फ निक्की अमरिकसिंग पंजाबी, वय-22 वर्षे, रा. कोळवले नगर, धुळे (2) बंटी शांताराम आहिरे, रा. मोहाडी उपनगर, धुळे 3) रवींद्र राजेंद्र वाघ, रा. मोहाडी उपनगर, धुळे 4) एक फरार आरोपी यांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील रितिक ऊर्फ निक्की अमरिकसिंग पंजाबी, वय-22 वर्ष, रा. कोळवले नगर, धुळे यास दिनांक 13/01/2025 रोजी अटक करण्यात आली होती. परंतु आरोपी क्रमांक बंटी अहिरे व अजून एक जण हे गुन्हा घडल्यापासुन फरार होते.
सदरच्या गुन्हयातील आरोपीतांनी लुटलेली रोख रक्कम हि सर्वसामान्य शेतक-यांची असल्याने पोलीस अधीक्षक, धुळे यांनी स्वतः सदर प्रकरणात लक्ष घालुन मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांना गुन्हयातील फरार आरोपीतांचा लवकरात लवकर शोध घेवुन चोरीस गेलेली रक्कम हस्तगत करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक शाशिकांत पाटील यांनी एक विशेष पथकाची नेमणुक केली . सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करुन आरोपीतांचा सुरत, गुजरात तसेच भिगवण, पारवाडी, ता. बारामती, जि. पुणे, अंगापुर वंदन, ता. जि. सातारा येथे जावुन शोध घेतला परंतु प्रत्येकवेळी गुन्हयातील फरार आरोपी हे पोलीसांना गुंगारा देवुन पळ काढत होते.
दि.13 रोजी सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे बंटी शांताराम आहिरे व रवींद्र राजेंद्र वाघ हे धुळे येथे येणार आहेत बाबतची खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाल्याने त्यांचे आदेशावरुन लागलीच गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे व शोध पथकातील अंमलदार यांनी सावळदे शिवारात रेल्वे लाईनच्या जवळ सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कडून सदर गुन्ह्यातील 7,48,185 /- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नमुद गुन्हयातील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. नमुद गुन्ह्याचा तपास पोउनि. संदीप काळे हे करीत आहेत,
वरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे, परि. पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, पोहवा संदीप कदम, पोहवा किरण कोठावदे, पोहवा सचिन वाघ, पोहवा पंकज चव्हाण, पोकों मनिष सोर्नागरे, पोकों मुकेश मोरे, पोकों प्रकाश जाधव, पोकों बापुजी पाटील, चालक पोहवा शशिकांत वारके अशांनी केली आहे.