जळगाव
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारी पदी बदली..
ठाणे जिल्हा परिषदेचे CEO रोहन घुगे जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी..

जळगाव – महाराष्ट्र शासनाने दि. 7 रोजी राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचाही समावेश असून त्यांची बदली नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले रोहन घुगे हे जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.
रोहन घुगे हे सध्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रोहन घुगे हे २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.