24 तासात घरफोडीचे 2 गुन्हे उघड: एमआयडीसी पोलीसांची कामगीरी..

जळगाव – सुरेश हिराराम सोलंकि रा प्लॉट नं. 7 एसटी वर्कशॉपजवक सावीत्रीनगर जळगाव है दिनांक 15 रोजी राजस्थान येथे पुतण्याचे लग्न समारंभासाठी घरादाराला कुलूप लावुन गेले होते. दरम्यान दिनांक 25 रोजी फिर्यादीचे घराशेजारी राहणारे लोकांनी घराचे कुलूप तुटलेले आहे व घर उघडे दिसत आहे असे फोनव्दारे कळविले असता, फिर्यादी हे राजस्थान वरुन घरी परत आल्यावर त्यांच्या लक्षात आले कि, किचन रुम मध्ये ठेवलेल्या कपाटातुन 1,60,000/- रुपयाची चांदी, व रोख 40,000/-रुपये चोरी गेल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन ला फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोधपथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीतांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या होत्या,एमआयडीसी पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी सदर परीसरातील जवळपास 51 सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार 1) विशाल मुरलीधर दाभाडे रा रामेश्वर कॉलनी जळगाव याने त्याचे साथीदारासोबत केल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्याचा शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. तो श्री ओंकारेश्वर मध्यप्रदेश येथे देवदर्शनासाठी गेला असल्याची गोपणीय माहीती पोका राहुल घेटे यांना मिळाली. सदर आरोपी हे गुन्हयातील चोरलेला माल विल्हेवाट लावण्याची दाट शक्यता असल्याने, पोउपनि राहुल तायडे यांचे सोबत गुन्हे शोध पथक लगेच ओंकारेश्वर मध्यप्रदेश येथे रवाना झाले होते. परंतु सराईत गुन्हेगार विशाल दाभाडे हा कोणताही पुरावा मागे ठेवत नसल्याने व तो नेमका कोठे थांबुन आहे याची काहीएक माहीती नसतांना गोपणीय रीत्या माहीती काढून व पोलीस अधिक्षक कार्यालयातील सायबर सेल येथील कर्मचारी यांनी तांत्रीक विश्लेषणाच्या मदतीने तपास पथकाला माहीती पुरविली. पोलीस पथकाने रात्रभर त्याचा ओंकारेश्वर मध्यप्रदेश येथे शोध घेतला असता तो एका लॉजमध्ये मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन विचारपुस करता त्याने गुन्हयाबाबत कबुली देवुन सदरची घरफोडी चोरी ही त्याचा साथीदार दिपक राजु पाटील रा महादेव मंदीराजवळ तांबापुर जळगाव याचे मदतीने केल्याबाबत सांगीतले. आरोपी दिपक राजु पाटील याचा ठावठीकाणा बाबत माहीती घेता तो मुक्ताईनगर येथे पळून गेल्याची माहीती मिळाली तरी नमूद पथकाने त्याचा शोध घेवुन त्यास अटक केली. सदर आरोपीतांकडुन तपासादरम्यान गुन्हयातील चोरीस गेलेला मालापैकि 1,15,000/- रुपयाची चांदी तसेच रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली एच.एफ डीलक्स मो सा. क एमएच 19 सीएल 2841 ही जप्त करण्यात आली आहे. आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे याचेवर जळगाव शहरातील एमआयडीसी पोस्टे, जिल्हापेठ पोस्टे, रामानंद नगर पोस्टे येथे एकुण 12 घरफोडी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.
तसेच दिनांक 22 रोजी गणेशपुरी मेहरुण जळगाव येथे राहणारे मोहसीन खान अजमल खान यांचे राहते घरातुन 23,300/-रुपये चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोका रतन गिते, नितीन ठाकुर, राहुल घेटे यांनी गुप्त माहीती काढून मास्टर कॉलनी परीसरातील विधीसंघर्ष बालकाने सदरची घरफोडी चोरी केल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याबाबत कबुली दिल्याने त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम 23,300/- रुपये हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि अशोक काळे, पोका नरेंद्र मोरे हे करीत आहेत.
वरील दोन्ही घरफोडी चे गुन्हें एमआयडीसी पोलीस स्टेशन ने गुन्हा दाखल झाल्यावर 24 तासांचे आत उघडकिस आणले.