
जळगाव : घरकुल बांधकामाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात 10 हजाराची रुपये लाचेची मागणी करणाऱ्या धरणगाव पंचायत समिती येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) व खाजगी इसमावर ACB नी गुन्हा दाखल केला.
यातील तक्रार दार यांना सन २०२४-२०२५या ब्लॉकमध्ये पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झालेले आहे. सदर योजनेतुन घरकुलचा पहीला हप्ता दिनांक ०३/०२/२०२५ रोजी रूपये १५,०००/- त्यांच्या बँक खाप्यावर जमा झालेला असुन, त्याप्रमाण त्यांनी त्यांच घराचे काम झालेले आहे. त्यांना मंजुर झालेल्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा झाला नसल्याने, त्याबाबत विचारपुस करण्यासाठी पंचायत समिती, धरणगाव येथे गेले असता सदर घरकुल संबंधित काम करणार इंजिनियर गणेश पाटील यांना भेटुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सध्या निधी नसल्याचे सांगितले, परंतु त्यांचे गावातील लोकाकडुन माहीती मिळाली की, त्यांचा घरकुलचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे. म्हणून तक्रारदार दिनांक ०८/०७/२०२५ रोजी सकाळी ११. ०० वाजेच्या सुमारास पंचायत समिती, धरणागाव येथे जावुन पुन्हा गणेश पाटील यांची भेट घेवुन घरकूलचा दुसरा हप्त्या बाबत विचारपुस केली. तेव्हा गणेश पाटील यांनी घरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १०,०००/- रूपये लाचेची मागणी केले बाबत त्यांनी दि. १४.०७.२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव सापळा पथकाकडे तकार दिली होती,
सदर लाचमागणी तकारीची दि. १४.०७.२०२१५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक गणेश पाटील, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती, धरणगाव यांनी तक्रारदार यांच्या पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या अंतर्गत मंजूर असलेल्या घरकुलाची दुस-या हप्त्याची रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली, तसेच दिनांक १६/०७/२०२५ रोजी सागर कोळी याचे मोबाईल फोनवरून सदरची लाच रक्कम सागर कोळी यांचे मार्फतीने स्विकारण्यास संमती दिली तसेच सागर कोळी (खाजगी इसम) याने लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवून प्रोत्साहन दिले, म्हणून गुन्हा.
सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक, योगश ठाकूर, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक,पोना बाळु मराठे, पोकों राकेश दुसाने, पोकॉ. प्रणेश ठाकुर, सचिन चाटे,यांनी केली.