रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत : अवैध गॅस भरणा केंद्रावर Dysp पथकाची कारवाई..

जळगाव – उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या विशेष पथकाने हरिविठ्ठल नगरात भरवस्तीत घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या वाहना मध्ये गॅस भरणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकास रंगेहात पकडले.
पोलिसांना गोपनीय माहिती होती की हरिविठ्ठल नगर परिसरात एका घरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये अवैध मार्गाने गॅस भरण्याचा व्यवसाय सुरू आहे. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, यापूर्वी जळगावमध्ये अवैध रिफिलिंगमुळे झालेल्या स्फोटात मनुष्यहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर धोक्याची दखल घेत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतःच्या नियंत्रणाखाली विशेष पथक तयार करून ही कारवाई केली.या कारवाईत गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३ भरलेल्या गॅस हंड्या, १ गॅस भरणारी मोटर आणि रेग्युलेटरसह साहित्य जप्त करण्यात आले
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली, स.फौ. कैलास सोनवणे, पो.ना. रविंद्र मोतीराया, पो.कॉ. अशोक पुसे या पथकाने केली