जळगाव
प्रभाग १३ मध्ये उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार..

जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवत जनसंपर्कावर भर दिला आहे. गाडगे बाबा चौक व मोहन नगर परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महायुतीचे उमेदवार प्रफुल देवकर यांच्यासह सर्व उमेदवारांनी दौलत नगर, रामनगर तसेच गाडगे बाबा चौक भागात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

या प्रचार दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून पुष्पहार अर्पण करत स्वागत केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. नागरिकांच्या या प्रतिसादामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे.