4 हजाराची लाच : जामनेरचा तलाठी ACB च्या जाळ्यात..

जामनेर– येथील तलाठीस ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून वसीम राजु तडवी, तलाठी, सजा-जामनेर, (वर्ग-३), तहसील कार्यालय, जामनेर असे त्याचे नाव आहे.
यातील मुळ तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी असुन परिवारासह राहतात. तक्रारदार यांनी दिनांक १६/१२/२०२५ रोजी मौजे जामनेर येथील बिनशेती दोन प्लॉट कायम खरेदी केले आहे.सदर प्लॉटची खरेदी केल्यानंतर तक्रारदार व त्यांची पत्नीचे फेरफार नोंद करून त्यांचे नात अधिकार अभिलेखात तसेत्त ७/१२ उताऱ्यावर दाखल करण्याकरीता वसीम राजु तडवी, तलाठी, सजा-जामनेर यांनी तक्रारदार यांचेकडे ५,०००/-ची लाचेची मागणी केली, म्हणून तक्रारदार यांनी दि.०७/०१/२०२६ रोजी वसीम राजू तडवी तलाठी, जामनेर यांचेविरूध्द ला.प्र.वि., जळगाव कार्यालयात तक्रार दिली होती.
तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीची दि.०७/०१/२०२६ रोजी पडताळणी केली असता वसीम राजू तडवी तलाठी,यांनी तक्रार दार व त्याच्या पत्नीचे नावे घेतलेल्या प्लॉटच्या फेरफार नोंद करून त्यांची नावे अधिकार अभिलेखात तसेच ७/१२ उताऱ्यावर दाखल करून देण्याचे मोबदल्यात ५,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती ४,०००/ रूपये लाच म्हणुन स्विकारण्याचे मान्य केले, त्यानंतर दि. ०७/०१/२०२६ रोजी तकारदार यांचेकडुन यातील वसीम राजु तडवी, तलाठी, सज्जा -जामनेर यांनी ४,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई
जळगाव एसीबी चे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकुर, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक,पो. ना. / बाळु मराठे, पोशि. / भुषण पाटील, यांनी केली.