प्रभाग क्रमांक ५ मध्ये पीयूष नरेंद्र पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

जळगाव – आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रभाग क्रमांक ५ मध्ये अपक्ष उमेदवार पीयूष नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देत असलेल्या पाटील यांना परिसरातील विविध भागांतून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान व आशीर्वाद
प्रचारादरम्यान पीयूष पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी पुष्पहार घालून, तर काही ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
“प्रभागाच्या विकासासाठी अभ्यासू, सुशिक्षित आणि सर्वसामान्यांशी जोडलेला प्रतिनिधी आवश्यक आहे. पीयूष पाटील यांच्यात ती क्षमता आहे,” अशा भावना यावेळी ज्येष्ठांनी व्यक्त केल्या.यावेळी बोलताना पीयूष नरेंद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक ५ मधील रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, तसेच महिला व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी असते. प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज महापालिकेत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्यांनी सांगितले.