जळगाव

प्रभाग क्रमांक : ५ अ मध्ये पाटील विरुद्ध भंगाळे निवडणुकीची तब्बल ३४ वर्षांनी पुनरावृत्ती..

जळगाव: शहरातील भंगाळे कुटुंबीय असेल किंवा पाटील कुटुंबीय हे दोन्ही कुटुंबीय हे उद्योजक तसेच जुने राजकीय घराणे म्हणून ओळखले जातात. अनेक वर्ष दोघ घराण्यांनी राजकीय कारकीर्द गाजवलेली आहे. व राजकारणात सक्रिय आहेत.

सन १९९२ साली भंगाळे कुटुंबातील अतिशय शांत संयमी चेहरा असलेले डॉ.प्रकाश भंगाळे विरुद्ध जळगाव शहर महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील अशी थेट रंगतदार लढत झाली होती.डॉ.प्रकाश भंगाळे हे सुरेश दादा जैन गटाकडून तर नरेंद्रअण्णा हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.आहे.त्यावेळी झालेली ही निवडणूक अतिशय लक्षवेधी तसेच चुरशीशी झाली असल्याची बोलले जाते. या निवडणुकीत मात्र नरेंद्र अण्णा यांचा विजय झाला होता व भंगाळे यांना पराभव पत्करावा लागला होता.

३४ वर्षांनी पुन्हा समोरासमोर थेट लढत आता तब्बल ३४

वर्षांनी पुन्हा भंगाळे कुटुंबीय विरुद्ध पाटील कुटुंबीय अशी थेट लढत होत असून या लढतीकडे जळगाव शहराचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

*सन २०१३ साली समोरासमोर लढत टळली*

सन २०१३ साली दोन प्रभाग रचनेचा वॉर्ड जाहीर करण्यात आला होता.यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विष्णू रामदास भंगाळे विरुद्ध जळगाव मनपाचे तत्कालीन नगरसेवक स्व.नरेंद्र अण्णा पाटील अशी समोरासमोर लढत होण्याची स्थिती निर्माण झालेली होती.परंतु विष्णू भंगाळे यांनी नरेंद्र अण्णा यांच्यासमोर थेट लढणे टाळले होते.

*दोन्ही गटांचा समाजात प्रभाव :*

भंगाळे कुटुंबीय हे देखील समाजामध्ये व्यावसायिक तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेले प्रतिष्ठित कुटुंबीय असून यांचा मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आहे.तसेच मोठ्या प्रमाणावर परिवार असून ते सदस्य देखील इतर पक्षांमध्ये सक्रिय आहेत. तसेच पाटील कुटुंबातील ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील हेदेखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून युवकांचा मोठा फौज फाटा त्यांच्याकडे आहे.तसेच नरेंद्र अण्णा यांच्यासोबत ची त्यावेळचे जेष्ठ मंडळी देखील त्यांच्यासोबत त्यांनी जोडून ठेवलेली आहे. भंगाळे यांची असलेला मोठा परिवार समाजातील प्रभाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत तर पाटील यांच्या युवा उच्च शिक्ष चेहरा तसेच नरेंद्रअण्णा यांची पुण्याई जमिनीची बाजू आहे.

३४ वर्षांनी पुन्हा उफाळाला हॉटेल रूपाली चा वाद

सन १९९२ साली हॉटेल रूपाली ही जळगाव शहरातील असलेले नवीन बस स्थानक ( आताचे सुद्धा शांती केंद्र )या ठिकाणी भाडेतत्त्वावर करारनाम्यावर होती.याच दरम्यान पाटील विरुद्ध भंगाळे असा निवडणुकीचा सामना रंगल्याने तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर वादविवाद देखील झाल्याने पुढे पाटील यांनी हॉटेल रूपाली चा विषय थेट कागदावर घेतला होता याबाबत जळगाव मनपाचे तत्कालीन नगरसेवक स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांनी थेट लेखी तक्रार करत माजी सैनिकांना सोबत घेत गांधीजींच्या पुतळ्याखाली आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले होते.

यामुळे मोठ्या प्रमाणावर दबाव तंत्र तयार होऊन सदर नवीन बस स्थानक परिसरात असलेली त्यावेळी ची हॉटेल रूपाली वर शासनातर्फे हातोडा चालवण्यात आला होता.तेव्हा हॉटेल रूपाली ही स्वातंत्र्य चौक या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली होती.

*असा उफाळला पुन्हा हॉटेल रूपालीचा वाद :*

नुकताच जाहीर झालेल्या जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जळगाव शहर महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष पाटील हे प्रभाग क्रमांक : ५ मधून obc वर्गातून निवडणूक लढवीत आहेत.त्यांनी विष्णू भंगाळे यांच्या विरोधात थेट दंड थोपटले आहे. या दरम्यान गांधी बगीच्या बाहेरील होकर सोबत विष्णू भंगाळे यांचा झालेल्या वादा चा आधार घेत पियुष पाटील यांनी थेट विष्णू भंगाळे यांना आधी आपले अतिक्रमण काढा नंतर दुसऱ्यांच्या अतिक्रमणावर बोला म्हणून आरोप केले एवढेच नव्हे तर हॉटेल रूपाली बाहेरील अनधिकृत असलेली होर्डिंग ची लेखी तक्रार करून प्रशासनातर्फे दंड देखील करण्यात आला. आणि यानिमित्ताने पुन्हा तब्बल ३४ वर्षांनी हा वाद रूपाली भोवती येऊन ठेपला आहे.

नुकताच विविध एजन्सी मार्फत तसेच गोपनीय अहवालांमार्फत आलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विष्णू रामदास भंगाळे यांना पियुष पाटील यांचे पारडे जड पडणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे प्रभागात मस्तीने संपूर्ण भंगाळे कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर कंबर कसली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे