जळगाव

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा..

मेहरुण येथील 'जैन ड्रीम स्पेसेस’ च्या क्रीडांगणावर T 20 चा रंगणार थरार; कान्हदेशातील खेळाडूंसाठी लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ

जळगाव  : – क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केली आहे. यावेळी व्यासपीठावर अड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांची उपस्थिती होती.

Indian Premier League (आयपीएल) च्या धर्तीवरील नियमावलीसह आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगणावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह आणि जल्लोष अनुभवायला मिळणार आहे.

“Own The Game, Lead The League, Build Legacy” अर्थात “खेळावर आपले स्वामित्व मिळवा, लीगचे नेतृत्व करा आणि कायमस्वरूपी वारसा निर्माण करा.” या घोषवाक्याखाली होणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

या लीगच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*विशेष माहिती (Info Box)*

स्पर्धा : जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2)

आयोजक : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन

स्थळ : जैन ड्रीम स्पेसेस कांताई नगर मेहरुण

स्वरूप : Indian Premier League च्या धर्तीवर T20 क्रिकेट स्पर्धा

विशेषता : पांढरा लेदर बॉल, खेळाडूंचे रंगीत कपडे, दिवस रात्रीचे सामने

क्रिकेट – कान्हदेशातील खेळाडूंना व्यासपीठ

*आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!*

“नवा जोश, नव्या थरारासह जळगाव क्रिकेट T20लीग तयार! खेळाची ताकद, जळगावची शान म्हणून याकडे बघितलं जाते. जळगाव व कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, या उद्देशाने जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन होईल आणि जळगावचा गौरव वाढेल. व जळगावकरांना मिळणार आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा खेळाडूंसाठी खेळाचा, व्यावसायिकांसाठी व्यवसायाचा मौका… या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन ने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच त्यांनी नोंदणी केल्यानंतर खेळता येईल असेही संघटने तर्फे नमूद करण्यात आले आहे

— *अतुल जैन*, अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे