यावल

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उमेश पाटील व उपसभापती म्हणुन पंकज चौधरी यांची सर्वांनुमते निवड..

यावल ( प्रतिनिधी ) यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती उज्जैनसिंग राजपुत व उपसभापती दिपक चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ४ नॉव्हेंबर रोजी नुतन सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील यांची तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांची एका मताने निवड करण्यात आली .

यावल कृषी उत्पन्न बाजार समिती च्या संचालक मंडळाच्या सर्वातुमते अंतर्गत ठरलेल्या विषयाअनुसार सभापती व उपसभापती पदासाठी निवडीसाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहाच्या अध्यासी अधिकारी कुणाल सोनारव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सर्व साधारण सभेत सभापतीपदी उमेश प्रभाकर पाटील यांची तर उपसभापतीपदी पंकज दिनकर चौधरी यांची निवड करण्यात आली .

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असुन,महायुतीच्या ठरलेल्या प्रमाणे सर्वांना सभापतीपदाचा सन्मान मिळण्याची समान संधी मिळावी या दृष्ठीकोणातुन विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपुत व उपसभापती दिपक नरोत्तम चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज दिनांक ४ नॉव्हेबर रोजी १ वाजता सभागृहात नविन सभापती व उपसभापती यांची निवड पार पडली . यासाठी भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीचे १९ संचालकांचे बहुमत असलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दिनांक ४ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाच्या संपन्न झालेल्या सर्वसाधारण बैठकीत भारतीय जनता पक्षाचे संचालक म्हणुन निवडून आलेले उमेश प्रभाकर पाटील यांची व उपसभापती पदासाठी भाजपाचेच संचालकपदी निवडून आलेले पंकज दिनकर चौधरी यांचे दोघांच्या नांवावर संध्याकाळी भालोद येथे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्क कार्यालयात पार पडलेल्या संपर्क पक्षातील पदधिकारी व संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत सभापती वं उपसभापतीच्या नांवावर निश्चीत करण्यात आले होते. आज संपन्न झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेस सर्वश्री मावळते सभापती उज्जैनसिंग राजपुत,उपसभापती दिपक चौधरी ,संचालक नारायण चौधरी,हर्षल पाटील,उमेश पाटील, राकेश फेगडे,पंकज चौधरी,बबलु कोळी,सौ.कांचन फालक,सौ राखी बऱ्हाटे, सागर महाजन,अशोक चौधरी,सुर्यभान पाटील,विलास पाटील संजय पाटील,सुनिल बारी, सौ स्वीटी बेंडाळे,डॉ निलेश गडे हे प्रामुख्याने उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे