१ लाखाची लाच : शनिपेठ पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक ACB च्या जाळ्यात..

जळगाव : शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळ तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल होता. या अर्जाची चौकशी पो.ना. विनोद अहिरे यांच्याकडे सुरू होती. दरम्यान, संबंधित प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी अहिरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान तक्रारदाराने दि. १३ एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार केली. त्यानंतर ACB पथकाने पडताळणी केली असता अहिरे यांनी पंचासमक्ष १ लाख रुपये लाच स्वीकारण्यास संमती दर्शविली.यानंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात गेले असता, अहिरे यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच पंचासमक्ष १ लाख रुपये स्वतः स्वीकारले. त्याचवेळी ACB पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले.सदर प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
सदर कारवाई
एसीबीचे पोलीस उप अधिक्षक, योगेश ठाकुर,हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक,स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, पोउप निरी. सुरेश पाटील, मपोहेकों/ संगिता पवार, पोकों/राकेश दुसाने, पोकों/सचिन बाटे,पोकों/अमोल सुर्यवंशी, यांनी केली.