जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त CEO करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार..

जळगाव/प्रतिनिधी :जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार, दि. १० एप्रिल रोजी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे अभियान संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता करिश्मा नायर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात पदभार स्वीकारताच कामकाजाला सुरुवात केली.

पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’

पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही इमारतीतील सर्व विभागांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील टेबलवर जाऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली व कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे