जळगाव

पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली..

श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधिक्षक..

जळगाव : राज्य शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस प्रशासनात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या पोलीस नेतृत्वातही मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शासनाने २० एप्रिल २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार जळगावचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.

डॉ. रेड्डी यांची नियुक्ती आता पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाने या बदल्या केल्याचे मानले जात आहे. जळगाव जिल्ह्यात श्रीकांत धिवरे यांच्या नियुक्तीमुळे पोलीस प्रशासनाला नवे नेतृत्व मिळणार असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आगामी काळात नव्या धोरणांची अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात विविध गुन्हेगारी प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आता श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस दलाची पुढील दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे