जळगाव

प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव..

जळगाव – जिल्ह्यातील राजकारणात सध्या एका नव्या नेतृत्वाबाबत चर्चा रंगू लागली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा वाढदिवस यंदा केवळ औपचारिक शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र म्हणून ओळख असली तरी प्रतापराव यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. ग्रामपंचायतीपासून राजकारणाची सुरुवात करत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. यामुळेच त्यांचा स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मजबूत झाला आहे.

प्रतापराव पाटील यांची कार्यशैली ही लोकांमध्ये मिसळणारी आणि तत्पर प्रतिसाद देणारी म्हणून ओळखली जाते. आरोग्यविषयक मदत असो किंवा सामाजिक उपक्रम, ते अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरले आहेत. विशेषतः तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षणीय आहे. कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांचा प्रभाव वाढताना दिसतो.

दरम्यान, आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महायुतीच्या जागावाटपात संबंधित जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्यास प्रतापराव पाटील हे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जनाधार आणि निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्ष नेतृत्व त्यांना संधी देईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे. ते विधान परिषदेत प्रवेश करतील का, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे