जळगाव

जळगावच्या तरुण समाजसेवकाला जिल्हा युवा सन्मान..

जळगाव : सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार यंदा पाचोरा येथील समाजसेवक कमलेश सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पोलिस परेड मैदान, जळगाव येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कमलेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कमलेश सोनवणे यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, लिंग समानता आणि क्रीडा या क्षेत्रांत सातत्याने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रभावी वक्ता म्हणूनही ते ओळखले जातात. यापूर्वी नवी दिल्लीतील विज्ञान भवन आणि भारत मंडपम येथे व्याख्यान देत त्यांनी जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे.सध्या ते स्वतःची सामाजिक संस्था चालवत असून केंद्र सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमाशी सक्रिय स्वयंसेवक म्हणून जोडलेले आहेत. या पुरस्कारामुळे समाजकार्यात आणखी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे