जळगाव

जळगाव पोलिसांचे ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ 

अवैध प्रवासी वाहतूक व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी बसेसची कसून तपासणी..

जळगाव : जिल्ह्यात वाढत्या अवैध प्रवासी वाहतूक आणि संशयास्पद हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ड्राईव्ह’ राबवून ट्रॅव्हल्स बसेसवर अचानक कारवाई केली. या मोहिमेत तब्बल ७० खाजगी बसेसची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडाचा चाप बसवण्यात आला.

ही कारवाई दोन टप्प्यांत पार पडली. रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास शहरातील महत्त्वाच्या प्रवेशबिंदूंवर नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची बारकाईने चौकशी करण्यात आली. पोलिसांनी प्रवाशांची पडताळणी, सामानाची तपासणी आणि चालकांची कागदपत्रे तपासून संशयास्पद हालचालींवर लक्ष केंद्रित केले.तपासणीदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून ई-चलनद्वारे सुमारे २० हजार रुपयांचा थकीत दंड वसूल करण्यात आला. तसेच, लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये ‘दोन चालक’ नियमाचे काटेकोर पालन करण्याबाबत ट्रॅव्हल्स चालक व मालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

याशिवाय, बसमधील अग्निशामक यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग यांसारख्या सुरक्षा सुविधांचीही तपासणी करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोणतीही त्रुटी आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांच्या संयुक्त सहभागातून पार पडली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे