जळगाव

जळगावात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश : ११ लाखांचा मुद्देमाल जप्त..

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जळगाव शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात फिर्यादी मोईज अध्याय बोहरा यांची ‘रुबी पेंट्स’ कंपनी असून त्याच ठिकाणी त्यांचे निवासस्थान आहे. फिर्यादी हे १३ एप्रिल २०२६ पासून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १५ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता परत आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरात पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघड झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून चाचरीया पाटी, सेंधवा व खरगोन परिसरात सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीत अटक संशयितानी घरफोडीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्यामध्ये निलेश उर्फ भुऱ्या माहेरिया डुडवे, ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे आणि यारशीरालाल मगन अलावे यांचा समावेश आहे.पोलिसांनी यांच्या कडून ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (५,४७,५०० रुपये), ९९ ग्रॅम चांदीचे दागिने (२५,००० रुपये) आणि ५,७८,००० रुपये रोख असा एकूण ११,०५,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सां गितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे