जळगावब्रेकिंग

 ५० हजारांची लाच :  मंडळ अधिकाऱ्यासह खाजगी पंटर नाशिक ACB च्या जाळ्यात..

जळगाव : नशिराबाद भागातील मंडळ अधिकारी मिलींद प्रकाश देवरे (वर्ग-३) व खाजगी इसम सुरेंद्र प्रल्हाद अहिरे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरोधात काही स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या शेतात अवैधरित्या खोदकाम सुरू असल्याबाबत तहसील कार्यालयासह इतर ठिकाणी तक्रार अर्ज दिला होता. मात्र, नंतर संबंधितांनी तो तक्रार अर्ज मागे घेतला होता. तरीदेखील या प्रकरणातील चौकशी बंद करण्यासाठी नशिराबाद भागाचे मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.दिनांक १२ मे २०२६ रोजी पंच साक्षीदारासमक्ष ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

ACB च्या माहितीनुसार, ही रक्कम थेट स्वतःकडे न घेता देवरे यांनी तक्रारदारास खाजगी इसम सुरेंद्र अहिरे यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. त्यानुसार तलाठी कार्यालय, प्रिप्राळा समोर तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नाशिक ACB च्या पथकाने खाजगी इसम सुरेंद्र अहिरे यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर मंडळ अधिकारी मिलींद देवरे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास ACBकडून सुरू आहे.

सदर कारवाई

नाशिक एसीबीचे , पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक, पोहवा/प्रफुल्ल माळी, पोहवा/विलास निकम, यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे