जळगाव

अवैध डिझेल साठ्यावर महसूल व पोलिसांची संयुक्त धाड : लाखोंचा साठा जप्त..

अमळनेर – तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्र परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या डिझेलच्या साठ्यावर महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत सुमारे 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. 27 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजेच्या सुमारास महसूल व पोलिस विभागाचे संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकामध्ये उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलिस अधिकारी चोपडा विभाग, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील तसेच ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांचा समावेश होता.

पथकाने तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसराची तपासणी केली असता प्लास्टिकच्या ड्रममध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल साठवून ठेवलेले आढळून आले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. तपासणीदरम्यान विविध ड्रममध्ये एकूण अंदाजे 1 हजार 470 लिटर डिझेल आढळले.

जप्त करण्यात आलेल्या डिझेलचा तपशील :

200 लिटर क्षमतेच्या 7 प्लास्टिक ड्रममध्ये एकूण 1,400 लिटर डिझेल

किंमत : ₹1,42,800/-

200 लिटर क्षमतेच्या 2 ड्रममध्ये प्रत्येकी 50 लिटरप्रमाणे एकूण 100 लिटर डिझेल

किंमत : ₹10,200/-

200 लिटर क्षमतेच्या 1 ड्रममध्ये 20 लिटर डिझेल

किंमत : ₹2,040/-

एकूण जप्त मुद्देमाल :

₹1,55,040/-

चौकशीदरम्यान संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींनी हा डिझेल साठा अमळनेर येथील गिरीश तुलशीदास बेलदार यांचा असल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात सदर साठा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तो अमळनेर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला आहे. संबंधित आरोपीविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर डिझेल साठवणूक केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 287 व 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अवैध इंधन साठवणूक, काळाबाजार तसेच वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवर प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे