जळगाव

महापालिकेत वजनकाटा खरेदीत भ्रष्टाचार ?  उपमहापौर मनोज चौधरी यांचा गंभीर आरोप..

जळगाव : महापालिकेत वजनकाटा बसवतांना मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला आहे. ५ लाख ७१ हजार रुपयात ५० टन क्षमतेचा वजन काटा बसविण्यात येत असतांना महापालिकेने ९ लाख ५० हजार रुपये खर्च करून ३० टन क्षमतेचा वजन काटा बसविला आहे. दोन ठिकाणी हे वजन काटे बसविण्यात आले असून यात ७ लाख ५८ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

नगरपालिका व महानगरपालिकांना ५० टन क्षमतेचा वजन काटा बसविण्याचे निर्देश शासनाने दिले असतांना जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र ३० टन क्षमतेचा दोन वजन काटे बसवले.मनपाच्या टी.बी हॉस्पीटल येथे एक वजन काटा बसविण्यात आला होता तर दुसरा वजन काटा हा महापालिकेचा कचरा डेपो (डंम्पिग ग्राऊडवर) वर बसवण्यात आला होता. परंतु काही काळानंतर टीबी हॉस्पीटलच्या जागेवरील वजन काटा बंद करण्यात आला. त्या ठिकाणी ई-बसचे चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार असल्यामुळे तो वजन काटा काढण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले मात्र, तेथील काटा कुठे गेला याबाबत उत्तर पदाधिकाऱ्या दिले जात नाही, तसेच तेथील काटा दोन वर्षापासून बंद असल्यामुळे एका खासगी वजनकाट्यावर कचऱ्याचे वजन केले जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून आतापर्यंत त्या खासगी काटा मालकाला लाखो रुपये महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मागील सहा ते सात महिन्यात मनपाने खासगी वजन काटा मालकाला १३ लाख ३७ हजार रुपये अदा केले असून आणखी दोन ते तीन महिन्यांचे बिल देणे बाकी आहे. इतका पैसा मनपाने त्या खासगी काटा मालकाला देण्यापेक्षा स्व:त नवीन वजन काटा बसवला असता तर, वर्षभराच्या बिलाच्या किंमतीत मनपाचे दोन ५०-५०टन क्षमतेचे वजन काटे बसले असते, तरी महापालिकेने स्वत:चे वजन काटे का बसवले नाही, असा प्रश्न उपमहापौर मनोज चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने डम्पिंग ग्राऊडवर बसवलेला काटा अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहे. तो वजन काटा दुरुस्त करण्यासाठी ३ लाख ९७ हजार रुपये खर्च करावा लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी वजन काट्याचे १३ लाख रुपये अदा करण्यासाठी महापालिकेकडे पैसे आहेत परंतु स्वत:चा वजन काटा दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही का? असा सवाल उपमहापौरांनी उपस्थित केला आहे. स्वत:चा वजन काटा दुरुस्त केल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना त्यात पैसे मिळणार नसून दुसऱ्यांच्या वजन काट्यावर वाहनांचे वजन केल्यास त्यात पाहिजे तसा भ्रष्टाचार करता येवू शकतो म्हणून हा फंडा राबविला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

मनपाच्या इमारतीत ८ कर्मचारी आहेत. त्यापैकी २ कर्मचारी १५ दिवसांपासून सुटी न टाकता गैर हजर आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी दोन मुकादम नियुक्त आहेत. तरी त्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही आरोग्य विभागाकडून करण्यात आली नाही, याचाच अर्थ आरेाग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे