जळगाव

जळगाव शहरातील वीज समस्यांवर उपमहापौरांच्या पुढाकाराने महापालिका व महावितरण यांची संयुक्त बैठक : तातडीने दुरुस्तीचे आदेश..

जळगाव | प्रतिनिधी – जळगाव शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्या, स्ट्रीट लाईट व्यवस्थेतील त्रुटी आणि धोकादायक विद्युत यंत्रणांबाबत तोडगा काढण्यासाठी उपमहापौरांच्या पुढाकाराने महापालिका आणि महावितरण अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले.

बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील तसेच नगरसेवक राहुल पाटील आणि गजानन मामा देशमुख उपस्थित होते. महावितरणकडून अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे तर महापालिका विद्युत विभागाकडून विभाग प्रमुख मोरे साहेब व कनिष्ठ अभियंता सुमित पाटील सहभागी झाले.बैठकीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शहरात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होणे, स्ट्रीट लाईट रात्री बंद व दिवसा सुरू राहण्याच्या घटना, अनेक ठिकाणी लोमकळणाऱ्या विजेच्या केबल्स, झाकण नसलेले ट्रान्सफॉर्मर, तसेच रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले.

विशेषतः नेमखेडी सबस्टेशन परिसरातील वीज पुरवठा आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडण्यात आला. तसेच लाईट गेल्यानंतर नागरिकांनी सबस्टेशनमध्ये संपर्क साधल्यास फोन न लागणे किंवा प्रतिसाद न मिळणे, या तक्रार निवारण व्यवस्थेतील त्रुटींवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व त्रुटींवर तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या कडक सूचना दिल्या. शहरातील वीज व्यवस्थेत सुधारणा करून नागरिकांना अखंड व सुरक्षित सेवा देण्यावर भर देण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे