जळगाव

डॉ. प्रीतीश चौधरी “नियतीचे चक्र” पुरस्काराने सन्मानित..

जळगाव – जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवाशी डॉक्टर प्रितेश गणेश चौधरी यांना अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा नियतीचे चक्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत यश संपादन करणाऱ्या महाराष्ट्रातील काही निवडक व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार दिला जातो 2026 सालच्या या पुरस्कारासाठी सुरवाडा येथील रहिवासी डॉक्टर प्रीतीश गणेश चौधरी यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

दिनांक 21 जून रोजी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भारतीय जैन संघटना व दिव्याच फाउंडेशन च्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा आदी उपस्थित होते.

डॉ प्रीतीश चौधरी हे दादाश्री विश्व ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष असून या संस्थेतर्फे अनेक सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करणे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासारख्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने अधिक काम करण्याचे बळ मिळेल व समाजातील शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहता येईल असे डॉक्टर प्रितेश चौधरी यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे