जळगाव

संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात मोफत आरोग्य शिबिर : लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी..

जळगाव, दि. 18 जुलै : जळगाव शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे शनिवारी (दि. 18) आर.एल. हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरामध्ये आर.एल. हॉस्पिटलचे डॉ. राहुल येवले, डॉ. स्वप्नील पालवे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने बेघर निवारा केंद्रातील लाभार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले तसेच आरोग्याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.या उपक्रमामुळे बेघर नागरिकांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्याची तसेच वेळेवर उपचार मिळण्याची संधी उपलब्ध झाली. लाभार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले.

यावेळी संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी, काळजीवाहक खंडू शिरसाठ, हर्षल वंजारी, सौ. शितल काटे, किरण मोरे तसेच निवारा केंद्रातील सर्व लाभार्थी उपस्थित होते. आयोजकांनी भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे नियमित आयोजन करून बेघर नागरिकांना अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे