जळगाव

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता..

जळगाव – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे स्व. बबन भाऊ बाहेती यांच्या जयंती निमित्त दि. १ व २ ऑगस्ट दरम्यान कांताई सभागृह येथे आयोजित जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या नईम अन्सारीने भुसावळच्या कॅरम क्लबचे दानिश शेखचा १८-१६ आणि २५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. त्याला रोख रुपये ४०००/- आणि चषक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दानिश शेख याला रोख रुपये ३०००/- व चषक प्राप्त झाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या अय्युब खान व रईस शेख यांना प्रत्येकी १५००/- रुपये व चषकाने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात नईम अन्सारीने अय्युब खान (तमन्ना कॅरम) याचा २५-०४ व २५-०६ असा पराभव केला आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात दानिश शेख याने रईस शेख (तमन्ना कॅरम) याचा १९-०८ आणि १९-१७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेत ५ ते ८ क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे फिरोज खान, सैय्यद मोहसिन, वसीम खान व रोशन खान यांनी प्रत्येकी रोख रुपये १०००/- चे बक्षिस प्राप्त केले. स्पर्धेतील सर्व पारितोषिके रोहन बाहेती यांच्यातर्फे देण्यात आली. सागर सोपारकर यांच्या तर्फे कॅरम स्ट्राईकर्स उत्तेजनार्थ म्हणून तीन खेळाडूंना देण्यात आलीत.

प्रमूख पंच म्हणून चंद्रशेखर नर्वरिया, बोर्ड पंच म्हणून सैय्यद युसुफ, वसीम मलिक, शेख अजीज, रईस शाह, वसीम खान, सज्जाद खान, जैद शेख, साकिब अन्सारी, अजहर शेख, अस्लम खान, सैय्यद जुबेर, शेख नाझीम यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी कॅरम असोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सचिव नितिन बरडे, उपाध्यक्ष रंगनाथ पाटील, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष मंजूर खान, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सैय्यद मोहसिन, योगेश धोंगडे, फिरोज खान, नासीर खान, अताऊल्लाह खान, शेख अजीज, मुस्तफा बागवान आदींनी सहकार्य केले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे