धानोरा येथे 453 लाभार्थ्यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न..

चोपडा | प्रतिनिधी – रोटरी क्लब जळगाव_ आणि _गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव_ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक *6 ऑगस्ट 2026, गुरुवार* रोजी धानोरा ता. चोपडा येथील _सुर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिर_ येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबीराला परिसरातील धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव अडावद इ. गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. एकूण *453 महिलांनी व पुरुषांनी* या शिबीराचा लाभ घेतला. शिबीरात महिलांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष मोफत हिमोग्लोबिन तपासणी, औषध वाटप आणि आरोग्य समुपदेशन
सर्वांसाठी मोफत दंत तपासणी आणि डोळे तपासणी
विशेष सुविधा गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
मान्यवरांची उपस्थिती शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी _रोटरी क्लब जळगाव_ चे अध्यक्ष ऍड. श्री. हेमंत भंगाळे, मानद सचिव *श्रीमती स्वाती ढाके, डॉ. पराग जहागीरदार, डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, रोटे. संदीप शर्मा, डॉ. माधुरी कासट, डॉ. हर्षदा पाटील, डॉ. ज्योती चौधरी, डॉ. पवन बजाज, डॉ. हर्षवर्धन जोशी हे उपस्थित होते. तसेच विजय जोशी, योगेश गांधी, सुबोध सराफ, राकेश चव्हाण, सुनील नानकर, सतपंथी मंदिर सेवा समितीचे विजय महाराज, गजानन चौधरी, सुरेंद्र महाजन, अध्यक्ष प्रदिप महाजन, वासुदेव महाजन उपस्थित होते.
_गांधी रिसर्च फौंडेशन_ तर्फे गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार यांनी शिबीराच्या पुर्वतयारी व आयोजनात मोलाचे सहकार्य केले.
गावकऱ्यांनी शिबीराबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारचे आरोग्य शिबीर वेळोवेळी घ्यावेत अशी मागणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि सतपंथ मंदिर सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.