गुन्हेगारीजळगावजळगाव जिल्हाब्रेकिंग

आसोदा-ममुराबाद बायपासवर भीषण अपघात; एक जण ठार ,चार गंभीर

तवेरा-ट्रकच्या समोरासमोर धडकेत गाडीचा चुराडा; ट्रक चालकावर गुन्हा

आसोदा-ममुराबाद बायपासवर भीषण अपघात; एक जण ठार ,चार गंभीर

तवेरा-ट्रकच्या समोरासमोर धडकेत गाडीचा चुराडा; ट्रक चालकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील आसोदा ते ममुराबाद बायपास रस्त्यावर ३१ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तवेरा कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ५८ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शांताराम केशव पाटील असे मयताचे नाव असून अपघातातील इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

रावेर येथून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांची तवेरा गाडी (क्र. एमएच ४८ पी ०७५५) आसोदा-ममुराबाद मार्गावरून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०५ डीके ५३१४) त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तवेरामधील सर्व पाच जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना तात्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे शांताराम पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेले रामचंद्र ईश्वर महाजन (वय १८), ईश्वर शालिक महाजन (वय ४५), निखिल संदीप पाटील (वय २६) आणि चालक जितेंद्र रामदास सुपलकर (वय ४०) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी जखमी रामचंद्र महाजन यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालक सतीश अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाका, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे