जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांची शिष्टाई विकासो गटसचिवांचा संप अखेर मागे

२२ महिन्यांपासून थकीत असलेल्या पगारासह अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लागणार..

जळगाव – गेल्या २० फेब्रुवारी २०२३ पासून राज्यभरासह जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे गटसचिव यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाबाबत अखेर तोडगा निघाला असून ना.गिरीषभाऊ महाजन व ना.गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांच्या यशस्वी शिष्टाईने जळगाव जिल्ह्यातील गटसचिवानी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे. गटसचिवांना लवकरच त्यांचे थकीत पगार मिळणार असून इतर मागण्या बाबत देखील पाठपुरावा होणार असल्यामुळे सोमवार दि.२० मार्च पासून जळगाव जिल्ह्यातील सर्व विकास सोसायट्यांचे कामकाज पूर्ववत सुरु होणार आहे.

पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या बैठकीत गट सचिवांच्या संदर्भातील अनेक वर्षांपासून वेतन व सेवा तसेच दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली व सकारात्मक निर्णय घेण्यात आले. जिल्हा बँकेत सत्ता बदल झाल्यानंतर नवीन चेअरमन संजय पवार व सत्ताधारी यांच्यासमोर गटसचिवांच्या कामबंद आंदोलनाचा विषय मार्गी लावण्याचे मोठे आव्हान होते, कारण विकास सोसायट्यांमध्ये ३१ मार्च च्या आत कर्ज भरणा झाल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के व्याजमाफी मिळते. मात्र गट सचिवांच्या कामबंद आंदोलनामुळे ३१ मार्च च्या आत भरणा होईल की नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, तसेच हजारो कर्जदार शेतकरी विकास सोसायटीचे खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळण्याची भीती देखील होती, मात्र नूतन सत्ताधाऱ्यांनी हे आव्हान लीलया पेलत आंदोलन मागे घेण्यात यश मिळाल्याने केवळ गटसचिवच नव्हे तर जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे